vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा

       सांगली, प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी मोफत विशेष महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील 18 ते 50 वयोगटातील रोजगार इच्छुक युवतींनी/महिला उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गणपती मंदिर रोड, नेमिनाथनगर, सांगली येथे सोमवार, दिनांक 23 मार्च, 2026 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. या महिला रोजगार मेळाव्यामध्ये 300 पेक्षा अधिक पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील मिलेनियम मोटर्स, सांगली, क्रेडिट ॲसेस ग्रामीण लि. सांगली, एल.आय.सी ऑफ इंडिया, सांगली, सिध्दी व्हिल्स, मिरज, ॲक्सिस बँक, कोल्हापूर, अभिजीत रोकडे अँड असोसिएटस्‌, स्किल जॉब सर्व्हिसेस, सांगली, सह्याद्री मोटर्स प्रा. लि. सांगली, आयआयएफएल समस्त फायनान्स लि., जी. मेक फर्निचर इंडस्ट्रीज, कसबे डिग्रज, मुथुट मायक्रोफिन लि. आदि नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविलेला आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आय. टी. आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक महिला उमेदवारांसाठी विविध पदांकरिता उपस्थित उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी, प्रत्यक्ष मुलाखतीस येताना आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – ०२३३ २९९०३८३

00000

संबंधित पोस्ट

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

नवी दिल्लीत 14 ते 27 नोव्हेंबर कालावधीत 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा· ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेसह जागतिक व्यापार,संस्कृती आणि नवकल्पनांचा भव्य उत्सव

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून माफक दरात सेवा

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू