vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

       अमरावती, प्रतिनिधी: सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवनात मंगळवार, दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे.

 या मेळाव्यामध्ये टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या नामांकित आयटी कंपनीमार्फत बीपीएस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून शैक्षणिक पात्रता बीए, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीव्हीओसी, बीएससी जनरल आहे. यात 2023 आणि 2024 यावर्षात उत्तीर्ण, तसेच एमए, एमकॉम 2024 आणि 2025 उत्तीर्ण पात्रता निकष राहणार आहे.

    निवड प्रक्रिया ही कागदपत्र पडताळणी, योग्यता परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीतून होणार आहे. नोंदणीसाठी surl.li/lxxjb लिंक वरूनही नोंदणी करता येणार आहे. अधिक महितीसाठी विभागीय रोजगार मेळावा कक्ष प्रमुख अजय चव्हाण (8983419799) तसेच विभागीय कौशल्य विकास सहायक अक्षय डोईजड (7972755787) यांच्याशी संपर्क साधावा.

    रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी सहभागी होऊन टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, विभागीय उप आयुक्त द. ल. ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

विधानपरिषद लक्षवेधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी