vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

 

जालना (प्रतिनिधी) : – आगामी सर्वच निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वार्डा-वार्डात भारतीय जनता पार्टीचे संगठन मजबूत करून केंद्र व राज्य सरकारच्या योजना माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील जनतेपर्यंत राबविण्याचे अवाहन जालना विधानसभा भास्कर आबा दानवे यांनी जालना महानगरातील संग्राम नगर येथे भारतीय जनता पार्टी च्या शाखा उदघाटन (दि.०९) प्रसंगी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना महानगराध्यक्ष सतीष जाधव, प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, विमलताई आगलावे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संग्राम नगर जालना येथील शाखा अध्यक्ष श्री.सतीश सूर्यवंशी, मार्गदर्शक आनंद भगत, बद्रीनाथ जांगडे, उपाध्यक्ष श्री.आनंद नाटेकर, सचिव श्री.उदय उपासे, सह सचिव श्री.दिपक नाटेकर, कोषाध्यक्ष प्रद्युम विजयसेनानी, सह कोषाध्यक्ष युवराज राजपूत तर सदस्य म्हणून सतीष सूर्यवंशी, आनंद नाटेकर,उदय उपासे,दिपक नाटेकर, प्रद्युम विजयसेनानी,युवराज राजपूत, रोहित जाधव, ललित गायकवाड, रोहित गायकवाड, चेतन नाटेकर,राहुल उपासे, प्रीतेश विजयसेनानी, विशाल काथवडे, अक्षय, राठोड,लोका भगत,यश कालीवाले, भरत कालीवाले,नितीन राजपूत,प्रदीप नाटेकर,निखील खाकीवाले,कार्तिक कोलापुरे,अक्षय राजपूत,कुंदन राजपूत,संतोष राजपूत,बजरंग राजपूत,कुणाल सरनाईक,कृष्णा धाडले,अमोल उपासे,करण माने,पवन राजपूत,करण राजपूत,उज्वल शेलार,राजन गायकवाड,रितिक शेलार, धनपाल जटावाले, गौरव खाकीवाले, अक्षय खांडेकर, रणवीर जटावाले, राम भूरेवाल, किरण माजण, मानव शेलार, राहुल पोतराज, विवेक भूरेवाल, शुभम भूरेवाल, अभिषेक भूरेवाल, नैतिक भूरेवाल, रवी नंद, अर्जुन फतेलष्करी, सचिन मेघावले,रोहित लांडगे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भास्कर आबा दानवे म्हणाले की, युवकांना भारतीय जनता पार्टी सोबत घेऊन राष्ट्रकल्याणाच्या कार्यात युवाशक्तीचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने भाजपा व भाजयुमो च्या शाखा स्थापन करण्यात येत आहे. असंख्य युवकांना भाजपासोबत जोडून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जालना भाजपाच्या वतीने शाखा स्थापना कार्यक्रम आखण्यात आला असून, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी असे निर्णय घेतले आहेत. यामुळे संपूर्ण देशातील नागरिक मोदी सरकारच्या कामगिरीवर खुश असून, आता युवक, शेतकरी, कष्टकरी, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिक भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाच्या सदस्यता नोंदणी महाअभियानाला सुरु आहे. यानिमित्त जालना विधानसभेत प्रत्येक बूथ वर सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली. जालना शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करावी. राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या भाजपा च्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे व या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रीय सहभागासाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन शाखा उदघाटन प्रसंगी भास्कर आबा दानवे यांनी केले.

यावेळी सिद्धिविनायक मुळे, अमोल कारंजेकर, सुभाष सले, आनंद झारकंडे, रामलाल जाधव, सुनील पवार, रोषण चौधरी, सेवक नारीयलवाले, डोंगरसिंग साबळे, करण झाडीवाले, प्रभुलाल गोमतीवाले, महेंद्र अकोले, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.बाबासाहेब पाटील कोलते प्रसिद्धी प्रमुख

 

संबंधित पोस्ट

खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील कृषी सेवा केंद्रांवर साठा व दर दर्शविणारे फलक अनिवार्य.राहाता तालुक्याची खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक संपन्न

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तिरंगा रॅलीचे 20 मे रोजी आयोजन

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*