vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

 

बुलडाणा, प्रतिनिधी: मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात गुणवत्ता प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच आत्मनिर्भर भारत, स्वामी विवेकानंद यांचे उद्योजकता, देशाच्या विकासात कौशल्याचे महत्व, एआय शाप की वरदान अशा विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद यांचा तरूणांच्या उत्तम शरीरयष्टीकडेही विशेष कल होता. त्यामुळे पारंपारिक क्रीडा स्पर्धा सुद्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष, आमदार, समाजसेवक उद्योजक व व्याख्यानकार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आजच्या तरूणांना पुढील भविष्याकरीता रोजगार व स्वयंरोजगार यांवर मार्गदर्शन सुद्धा केल्या जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी व आपल्या मुलांच्या पुढील उज्वल भवितव्यासाठी नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. ही गंगावणे यांनी केले आहे.0000000

संबंधित पोस्ट

क्षेत्रपाल धनगरवाडीतील 26 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य दरड कोसळल्यानंतर तातडीची कार्यवाही; वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला गती;जिल्ह्यात 423 तरुणांच्या उद्योगांना बँकेचे बळ

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त**केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवातमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta