vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…

राज्य प्रतिनिधी -भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) परिषद आयोजित केली. ही परिषद नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे घेण्यात आली.

परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू व डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या SIR तयारीचे सविस्तर परीक्षण केले.

परिषदेत बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे अनुभव, धोरणे, अडचणी आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी सादरीकरण केले, जेणेकरून इतर राज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्या, शेवटच्या SIR ची पात्रता दिनांक, तसेच मतदार यादीतील माहिती सादर केली. याशिवाय, मागील SIR नंतर झालेल्या मतदार याद्यांचे डिजिटायझेशन व वेबसाइटवर अपलोड स्थितीही मांडण्यात आली.

त्याचप्रमाणे, विद्यमान मतदारांची शेवटच्या SIR मधील मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहे, याची माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १,२०० मतदार असावेत, याकरिता मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला.

मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही व अपात्र नागरिकाचा समावेश होणार नाही, यासाठी आवश्यक कागदपत्रांची शिफारसही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. या कागदपत्रांच्या सादरीकरणात नागरिकांना सोयीचे व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला.

याशिवाय, जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), EROs, AEROs, BLOs आणि BLAs यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणाची स्थितीही आयोगाने तपासली असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

वारणा धरणात 20.85 टी.एम.सी. पाणीसाठा

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानशासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन