vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई, प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला.

या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक, जल जीवन मिशनच्या सह अभियान संचालक दिपाली देशपांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले, पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मार्गी लावून नागरिकांना शाश्वत व दर्जेदार पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळावा. ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांकडून घ्यावा. ज्या योजनांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव असतील ते प्राधान्याने पाठवावेत. ज्या योजनांचे काम मूळ अंदाजपत्रकानुसार पूर्ण झाले मात्र अतिरिक्त छोट्या रकमेची गरज आहे अशा पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्धतेबाबत प्रयत्न व्हावेत

बैठकीत कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, सुरेगाव, मळेगाव थडी, धारणगाव, रवंदे, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर व वारी कान्हेगाव तसेच राहाता तालुक्यातील रुई-शिंगवे, पुणतांबा व नपावाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे., कोकमठाण ता. कोपरगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामास मंजूरी देणे, कोकमठाण ता. कोपरगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आवश्यक जागा संपादनासह मंजुरी देणे आणि माहेगाव देशमुख ता. कोपरगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव प्रस्तावास मंजूरी देणे या विषयावर चर्चा करण्यात आली.

०००

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा #पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील -जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

vishwatmaklokswamivarta