vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी…

मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी…

नवी दिल्ली – प्रतिनिधी-

संसदीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

खासदार नरेश म्हस्के हे निवडून आल्यापासून मुंबई आणि ठाणे उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी संसदेत आवाज उठवत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी संसदेचे कामकाज गोंधळ घालून ठप्प केले आहे. आज खासदार नरेश म्हस्के यांना संसदेत बोलायची संधी मिळताच त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासावर आवाज उठविला.

 

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झालेली आहे. उपनगरीय रेल्वेच्या स्थितीत अजूनही सुधारणा करणे गरजेचे आहे. २०२४ मधील आकडेवारीनुसार अतिगर्दी, रेल्वे रुळ ओलांडणे आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा चारपट अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने ‘सुपर-डेन्स क्रश लोड’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, दरवाज्यांवर लटकून प्रवास करणे आणि अपघात होणे ही नियमित बाब बनली असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले.

संसदीय समित्या आणि न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार, स्वयंचलित दरवाजे, फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे यांसारख्या मूलभूत सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत असल्याची खंतही खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

यावर उपाय म्हणून सर्व १२ डब्यांच्या लोकलचे टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावे, सर्व रेकमध्ये ऑटो-डोअर क्लोजिंग सिस्टीम अनिवार्य करावी तसेच स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निगराणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. भविष्यात अशा दुर्दैवी मृत्यूंना आळा घालण्यासाठी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचेही खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*

उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाचे नंदनवन – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू .प्रकल्पातील दोन लाईनचे काम पूर्ण- ⁠दुष्काळी जत तालुक्यासाठी जीवनदायी