vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्त स्तरावर केले आहे. याबाबत काही हरकती व सूचना किंवा तक्रारी असल्यास दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील मतदारांचे नाव https://mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर पाहता येईल. त्यावर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इ. स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही. मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात, तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तर :एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सवा’स पुणे येथे सुरूवात, 15 दिवस 35 स्पर्धांचे आयोजन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत रानहत्तींचा वावर: रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका; वनविभागाचे नागरिकांना आवाहन*