vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक..

मुंबई, प्रतिनिधी: एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याने संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी यासंदर्भात उत्सुकता दर्शवली असल्याने या नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

प्रकल्प आराखडा तयार,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी व मेडिसिटी आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली असून प्रकल्पासाठी जागा संपादित करण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली. मेडीसीटीसाठीही आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

स्टार्टअप आणि संशोधनला चालना मिळणार,जगातील नामांकित आणि अग्रगण्य विद्यापीठे देशात तसेच महाराष्ट्रात आपले कॅम्पस सुरु करत आहेत. या माध्यमातून विविध क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्टार्ट अप्सची संख्याही वाढेल. या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

संबंधित पोस्ट

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण ! हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल ! – स्वामी आनंदस्वरूप महाराज, शांभवी पीठाधीश्वर –

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर