vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर…

नवी दिल्ली प्रतिनिधी,  : भारतीय निवडणूक आयोग यांनी 2026 मधील आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर वार्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र अनिवार्य आहे. तसेच निवडणूक आयोगाने अधिकारपत्र दिलेल्या माध्यम प्रतिनिधींचा ‘अत्यावश्यक सेवा’ श्रेणीत समावेश केल्यामुळे मतदानाच्या दिवशी कार्यरत असलेल्या पत्रकारांना टपाल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, निवडणूक प्रक्रियेच्या कव्हरेजसाठी मतदान केंद्रांवर प्रसारमाध्यम व्यक्तींचा प्रवेश निवडणूक नियम, 1961 च्या नियम 32 मधील तरतुदींनुसार मतदान केंद्राध्यक्षांद्वारे काटेकोरपणे नियंत्रित केला जाईल. पारदर्शकता वाढवण्यासाठी बहुस्तरीय पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली असून, माध्यम प्रतिनिधींना कव्हरेजसाठी केंद्र सरकारच्या पत्र माहिती कार्यालय किंवा संबंधित राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक राहील. प्राप्त अर्जांची तपासणी माहिती व जनसंपर्क किंवा पीआयबी यांच्या स्तरावर केली जाईल. पात्र माध्यम प्रतिनिधींची अंतिम शिफारस आयोगाकडे पाठविण्यात येईल. वरील सर्व संस्थाना यादीची योग्य छाननी करण्यात आली आहे, अर्जदार हे खरे माध्यम प्रतिनिधी आहेत आणि ते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विहित निकष पूर्ण करत असल्याचे प्रमाणित करून द्यावे लागणार आहे.

शिफारस केलेल्या प्रसारमाध्यम व्यक्तींची एकत्रित यादी नंतर मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवली जाईल. अधिकृत अधिकाऱ्याद्वारे योग्य प्रमाणीकरण केल्यानंतरच अधिकार पत्र जारी केले जाईल. पारदर्शकता आणि अखंडता राखण्यासाठी आयोगाने आदेश दिला आहे की या प्रक्रियेत कोणत्याही फॅसिमाइल (हुबेहूब स्वाक्षरी) आणि/किंवा रबर स्टॅम्पचा वापर केला जाणार नाही.

मतदान केंद्रांवर वार्तांकन करताना मतदानाची गोपनीयता अबाधित राखणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही माध्यम प्रतिनिधीस मतदान कक्षामध्ये प्रवेश करून चित्रीकरण किंवा छायाचित्रण करण्यास सक्त मनाई असेल. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात येईल व त्यांचे अधिकृत पत्र रद्द केले जाणार आहे. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

१५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन २०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या सक्रिय सहभागातून रायगड जिल्हा विकासाचे नियोजन* — महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे*स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

बीजोत्पादनातून महिला सक्षमीकरणाचा ‘जालना पॅटर्न’