vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

 २० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

 जालना प्रतिनिधी: मराठवाड्यातील आठ लाख व्यापारी वर्गांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संस्था ,मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स च्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त २० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस चेंबरचे सदस्य तसेच जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निवडक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत मराठवाड्यातील ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर विचार मंथन होऊन ठोस ठराव मांडले जाणार आहेत. त्यामध्ये स्वतंत्र व्यापार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी तसेच व्यवसाय कर रद्द करण्यासंबंधीचा ठराव, वन नेशन वन टॅक्स व वन रेटचा फायदा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणे, ग्राहकभिमुख बाजारपेठेसाठी पोषक वातावरण निर्मिती करणे, प्रत्येक जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या समस्यांवर मोकळा संवाद, महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा जास्तीचे असणारा विजेचा दर अशा विविध विषयांवर चर्चा होऊन ठोस ठराव मांडले जाणार आहेत. हे संमत झालेले ठराव राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मान्यता घेतली जाणार आहे. या परिषदेस जिल्हा व गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा, माजी अध्यक्ष प्रफुल्ल मालानी,महासचिव शामसुंदर लोया , कोषाध्यक्ष विकास साहुजी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, गजानन घुगे सूर्यकांत हाके पाटील, संजय मोदानी, सचिव संतोष कावळे पाटील, जफर मिर्जा, सहसचिव संजय दाड, संदीप लाहोटी यांनी केले आहे.

चौकट-आगामी काळात रोजगाराच्या मुबलक संधीटोयोटो, किर्लोस्कर, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, ग्रीन मोबिलिटी, लुब्रिझोल, एम्ब्रिको, मेटलमन ग्रुप अशा आघाडीच्या उद्योग समूहांनी डीएमआयसी मधील शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, स्थानिक व्यापारातही लक्षणीय वाढ होणार आहे. हाच बदल व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. त्याला सुसंगत राहण्यासाठी आपल्या व्यवसायाला अपडेट करणे जरुरीचे आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा व्यापारी परिषदेत २० जुलै रोजी मंथन होणार आहे.

– शामसुंदर लोया, महासचिव, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

संबंधित पोस्ट

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा एकतेचा संदेश • मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी • सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार 150 युनिटी मार्च’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक;इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल…

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

गिरगाव चौपाटी गेट वे ऑफ इंडिया, आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई