vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

        सांगली, प्रतिनिधी: नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर करण्यात आला आहे. राखीव जागांसाठी निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत. सदर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२५ मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीची असून अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली…

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सतर्कतेमुळे-मुरबाड मध्ये दोन बालविवाह थांबवण्यात यश

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड

जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे