vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

रायगड( प्रतिनिधी:- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे. https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या लिंकच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे दि.30 जुलै 2025 पासून सुरु होणार असून शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी केले आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे अनु.जाती, व विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थाना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात.योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग, कच्छि भवन, नेमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधवा

000000

संबंधित पोस्ट

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

गोव्यात दुर्दैवी घटना- शिरगाव मंदिराच्या जत्रेत चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जखमी झाल्याची बातमी

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रेल्वेने विनातिकीट प्रवास केल्यास आता दुप्पट दंड! लवकरच अधिसूचना होणार जाहीर

मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न..

3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर…