vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

 

नागपूर, प्रतिनिधी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू घरूनच असल्याने ते यात कमी पडणार नाहीत. यादृष्टीने विचार करून गुणवत्ताधारक पाल्यांना आयपॅड व इतर साहित्य देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
नियोजन भवन येथील सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या आठवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या गुणवत्ताधारक पाल्यांना टॅब व शैक्षणिक आज्ञावलीच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय जेव्हा विभाग प्रमुख म्हणून, या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही घेतो तेव्हा नकळत या यशामागे या विभागातील कर्मचाऱ्यांचेही हात व मेहनत आहे, याची जाणीव उद्योग मंत्री म्हणून मी प्रत्येक वेळेस ठेवली आहे. या जाणिवेतूनच आपल्या आरोग्य विमाबाबत, आपल्याला लागणाऱ्या सेफ्टी साहित्य याचबरोबर दुचाकी वाहनासाठी पूर्वी असलेली मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.अलीकडच्या वर्षात महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेऊन यासाठी लागणारी कामे अतिशय अल्प कालावधीत पूर्ण करून दाखवले. अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क साठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन हे केवळ 45 दिवसात आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर व अमरावती विभागातील 51 पाल्यांना टॅब देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य राजेश झंजाड, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे व मान्यवर उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा 

नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड-सर्वोत्कृष्ट शाखा बनविण्याबरोबरच नाट्यसंमेलन ठाण्यात घेण्याचा म्हस्के यांचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवा!जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना, बांधकाम, टर्फ निष्कासित करण्याची कारवाई सुरू*