vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 22 एप्रिल 2026 सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार असून जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.पासून हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहुर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.रा.म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

आधिक माहितीसाठी संपर्क सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड. दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आताप्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी..

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा-पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार,पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार- पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

धारावी विभागात भाजपाने केले ध्वजारोहण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप..

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

राष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाखांहून अधिक रकमेची वसुली; १०० प्रलंबित आणि २२ दाखलपूर्व खटले निकाली

जालना मनपात तब्बल तेरा वर्षांनी शिक्षक दिन उत्साहात शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांच्या पुढाकारातून शिक्षकांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे सभागृह नेते महेशराव निकम यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta