vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी २२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ घेण्यात आली होती. ही ऑनलाईन परीक्षा ३ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन सत्रात पार पडली. परीक्षेसाठी एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते, त्यापैकी ३८५५९ परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते.

परिषदेकडून हा निकाल १३ मार्च २०२६ रोजी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in वर जाहीर करण्यात आला. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाटीईटी अथवा सीटीईटी ही सर्वांत पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती पूर्वी १६ मार्च ते २१ मार्च २०२६ या कालावधीत https://mscepune.in/dtedola/KP२०२६Info.aspx या लिंकवर भरायची होती. मात्र, उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती २२ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भरण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सहकाराची ताकद वाढविण्यासाठी प्रशिक्षण हाच उत्तम पर्याय – मंत्री चंद्रकांत पाटील

राष्ट्रपतींच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन