vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

 

जालना | प्रतिनिधी :

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या **‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’**मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ढोर समाज संघटना, जालना जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सकाळी प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात संविधानिक आणि लोकशाही मार्गाने समाजाची भूमिका शासनापर्यंत पोहोचविणे हा मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे.

मोर्चात जालना जिल्ह्यातील सर्व ढोर समाज बांधव, माता-भगिनी, युवक-युवती तसेच समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गाव, वस्ती आणि परिसरातून जास्तीत जास्त उपस्थिती राहून समाजाची एकजूट दाखवावी, असेही संघटनेने नमूद केले आहे.

मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन करत, सर्वांनी वेळेत उपस्थित राहून संघर्ष मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव विनिता वेद सिंग,100 दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबईच्या धारावीतील ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी साधला संवाद..