vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या धारावीतील ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी साधला संवाद..

मुंबईच्या धारावीतील ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी साधला संवाद..

मुंबई प्रतिनिधी-ज्येष्ठांची होणारी फसवणूक घ्यावयाची दक्षता अनोळखी व्यक्तींकडून होणारी लुबाडणूक याकरिता मोहाला बळी न पडता ज्येष्ठांनी सजग व सावध राहावे या करिता गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेचार ते सहा या वेळात स्थळ प्राऊड संस्था कार्यालय माता महाकाली मैदान सुभाष नगर धारावी या ठिकाणी धारावी पोलीस ठाणे महिला पोलीस निरीक्षिका श्रीमती संगीता माने व पोलीस उपनिरीक्षिका सायली वारके यांनी विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या संवाद व सल्ला मसलत या उपक्रमात उपस्थित जेष्ठानसोबत चर्चा करून जेष्ठांना आलेले अनुभव शेअर करून होणारी फसवणूक छळवणूक सावधपणे कशी हाताळावी घटनेच्या वेळी शेजाऱ्यांशी किंवा पोलिसाची संपर्क कसा करावा तसेच आपल्या मोबाईलचा वापर किंवा बँक खाते एटीएम दागिने दुसऱ्याकडून करून न घेता वेळी सावध व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या यावेळी हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री दिलीप गाडेकर व प्राऊड संस्थेचे नितीन सोनटक्के ही मंडळीही उपस्थित होती यांनीही मार्गदर्शन केले

 पोलीस व ज्येष्ठ नागरिक यांचा संवाद संपर्क वाढावा जनजागृती व्हावी याकरिता समाजानेही पुढाकार घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करावी असेही आव्हान श्रीमती संगीता माने यांनी यावेळी उपस्थित समुदायाला केले उपस्थित ज्येष्ठांच्या प्रश्नाला शंकेना संक्षिप्त स्वरूपात उत्तरे देण्यात आली कार्यक्रमाचे शेवटी अलका साबळे व शंकर गोपींनी यांनी सर्वांच्या आभार मानले आहेत

संबंधित पोस्ट

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण प्रगतीसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बँक ऑफ इंडिया, आष्टी शाखेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन… 

vishwatmaklokswamivarta