vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे
द्वितीय प्रशिक्षण संपन्न

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी:- राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण दिनांक १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह व सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे पार पडले. या प्रशिक्षणासाठी १ हजार ८३४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रशिक्षण स्थळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची सैद्धांतिक माहिती देण्यासोबतच ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.

 

या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) देवानंदा रेयांग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव, जिल्हा नोडल अधिकारी गौरी सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पार पाडली.

हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, सर्व मंडळ अधिकारी, राहुरीचे ग्राम महसूल अधिकारी, सर्व झोनल अधिकारी व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन