vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पाटचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी राज्याचे महसुलमंत्री मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन रामनगर (सा.का.), तालुका जालना महसुल मंडळामध्ये आठ गावे सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

माजी आ. अरविंदराव चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानेगांव (जहा.), मानेगांव (खा.), गणेशपुर, बाजीउम्रद, पारेगांव, जैतापुर, मोतीगव्हाण, निरखेडा पूव ही गावे रामनगर महसुल मंडळाच्या हद्दीत होती. मात्र काही महिन्यांपूव ती गावे सांवगी तलान महसुल मंडळात समाविष्ट करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व मागणीच्या अनुषंगाने ही गावे पुन्हा रामनगर महसुल मंडळात आणावीत. शेतकरी नेहमीच रामनगर मंडळाच्या कार्यपद्धतीशी परिचित असल्याने, सध्याची व्यवस्था बदलल्याने त्यांना होणाऱ्या गैरसोयींचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. “शेतकऱ्यांची मागणी मान्य करून गावांचा पुन्हा रामनगर मंडळात समावेश करावा,“ अशी विनंती चव्हाण यांनी महसुलमंत्र्यांकडे केली आहे.

या मागण्यांचे निवेदन आज महसूल मंत्री जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांची भेट घेवून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पाटचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिले. निवेदनाची दखल म्हणून महसूल मंत्री यांनी लवकरच या संदर्भातील मागणीचा निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेख महेमूद, अण्णासाहेब चित्तेकर, मिर्झा अन्वर, संतोष ढेंगळे, श्री. पवार आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्व स्तरावर व्यापक जनजागृती करावी  – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

सुरक्षा मंत्रालायची पत्रकार परिषद,कमोडोर रघु आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची भारत-पाकिस्तान संघर्षविराम करारानंतर पत्रकार परिषद 

vishwatmaklokswamivarta

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातल्या ६६ शिक्षकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण