vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्यास्थानिक बातम्या

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

 3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया-प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके.

 

मुंबई प्रतिनिधी-

ऍसिडिटी चा त्रास समजून एक सतत एक महिना गोळ्या खाणाऱ्या 52 वर्षीय महिलेच्या पोटात फुटबॉल च्या आकारात 3.8 किलो ची कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यात सेंट जॉर्ज हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय पथकाला यश मिळाले असल्याची माहिती प्रसिद्ध सर्जन प्राध्यापिका स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके यांनी दिली आहे.

कुलाबा येथे राहणारी रुग्ण महिला नामे नजमुन्नीसा खान यांना श्वासोच्छ्वास घेण्याचा त्रास होता. तिला तातडीच्या उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये आणले होते, त्याचबरोबर अति रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे तिला देखील मेडिकल वार्डामध्ये दाखल करण्यात आले होते तिच्या रक्त तपासण्या बरोबर सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळी तिच्या पोटात पाणी झाल्याचे आढळले. यानंतर तातडीने पुन्हा वैद्यकीय तपासण्या केल्या असता गर्भाशयाच्या पिशवीच्या लगत मोठी गाठी असल्याचे दिसून आले. त्यावेळी डॉक्टरांनी सदर महिलेला स्त्रीरोग शस्त्रक्रिया कक्षात हलविले श्वासोच्छवासाला होणारा त्रास त्यात उच्च रक्तदाब असताना पोटातील गाठ ही कॅन्सर सदस्य असल्याचे शस्त्रक्रिया करणे तसे अवघड होते. यामुळे शस्त्रक्रिया करताना अधिक काळजी घ्यावी लागली होती.यापूर्वी असंख्य गुंतागुंतीच्या केसेसवर शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव असणाऱ्या सेंटजॉर्ज रुग्णालयात तील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ प्राध्यापिका राजश्री दयानंद कटके आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून सदर महिलेला जीवदान दिल्याचे सदर महिलेच्या नातेवाईकांद्वारे सांगितले जात आहे

याबाबत रुग्ण महिला नजमुन्नीसा खान यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, जेव्हा मला कळले की माझ्या पोटाजवळ एक गाठ आहे. तेव्हा मी घाबरले आणि शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला परंतु सेंट जॉर्ज रुग्णालयातील स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी माझे मार्गदर्शन करून मला आश्वासन दिले की त्या माझ्यावर शस्त्रक्रिया करतील आणि मी पूर्णपणे बरी होईल असे त्यांनी सांगितले.

 याबाबत प्राध्यापिका प्रसिद्ध सर्जन डॉक्टर राजश्री कटके यांनी असे सांगितले की, रुग्ण महिलेच्या अल्ट्रासाउंड आणि सिटीस्कॅन मध्ये सदर गाठ सुमारे 22 ×12×7 सेंटीमीटर असल्याचे आढळून आले. सदर गाठ आतड्यांना चिटकली होती. त्या गाठीचा आकार इतका होता की रुग्णालयाच्या मूत्रमार्ग, फुफ्फुसे आणि हृदय आधी अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागले असते. संपूर्ण गर्भाशयासह ती गाठ तीन तासाच्या जटिल शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती असे यावेळी सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन**आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी; एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.