vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

लातूर, प्रतिनिधी: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. आठवले यांचे २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आगमन होईल. अहमदपूर येथील काळेगाव रोडवरील कमला नेहरू शाळेजवळील भाऊसाहेब वाघंबर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता अहमदपूर येथील विद्युत कॉलनीतील बाबासाहेब कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ५.३० वाजता उदगीर येथील राजनगर मधील देविदास कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ६ वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ६.३० वाजता उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. रात्री ७.५० वाजता लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले हे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत केद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजनांविषयी आढावा बैठक घेतील. दुपारी १२ वाजता औसा तालुक्यातील टाका येथील पाटोळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. दुपारी १.३० वाजता किल्लारी साखर कारखाना येथील विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी २.४५ वाजता किल्लारी येथील तक्षशीला बौद्धविहार येथे बौध्द धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाहीर सभा होईल. सायंकाळी ६ वाजता अहमदपूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

***

संबंधित पोस्ट

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदू संघटनांची उपस्थिती!शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही; ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार!

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अशोक काकडे- एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक 

vishwatmaklokswamivarta

अती दुर्गम भागातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना -२६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta