vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

*द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*

कोईमतुर/मुंबई प्रतिनिधी- तामिळनाडु विधानसभेच्या एकुण 234 जागांपैकी 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असून उर्वरित 216 जागांवर एनडीएला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा दृष्टीकोन दक्षिणेतील जनतेलाही पटलेला आहे. एनडीए सरकारने देशाचा वेगाने केलेला विकास पाहुन दक्षिणेतही एनडीएचा महाविजय होणार आहे. अभिनेते विजय यांनी तामिळनाडुत सर्व जागांवर उमेदवार उतरविल्याने मतविभागणीचा लाभ भाजप आणि एनडीएला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तामिळनाडुतील स्टॅलिन यांचे द्रमुक सरकार उलथवुन टाका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

 कोईमतुर जिल्हयातील त्रिपुर नॉर्थ विधानसभा मतदारसंघाच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला उमेदवार के. कार्तिकादेवी यांच्या निवडणुक प्रचार रॅलीला संबोधीत करतांना ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडु प्रदेशाध्यक्ष फादर एन सुसाईआणि अनेक रिपब्लिक पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दोन दिवसांच्या तामिळनाडु दौ-यांवर आले असून आज त्यांनी कोईमतुर आणि नामक्कल जिल्हयातील विविध मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा तसेच भाजप प्रणित एनडीए उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या तामिळनाडुमध्ये 18 उमेदवारांमध्ये 5 उमेदवार हे अनुसुचित जातीचे 11 उमेदवार हे इतर मागास वर्गातील असुन 2 उमेदवार हे मुस्लिम आहेत.

 तामिळनाडु हे दक्षिणेतील महत्वाचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए यंदा तामिळनाडु, पाँडेचेरी आणि केरळ या सर्व राज्यांवर विजय मिळवुन एनडीएचा दक्षिण विजय निश्चत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 57 कोटी लोकांचे बँक खाते खोललेले आहे. 50 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा लाभ दिला आहे. 6 कोटी लोकांना उज्वला योजनेद्वारे सिलेंडर गॅस दिलेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला आहे. देशभरातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेली आहे. देशभरातील अनेक रस्ते चांगले करण्यात आलेले असून देशाची आर्थिक व्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. देशात विकास झपाटयाने होत आहे. भारताचे उपराष्ट्रपती असणारे सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडुचे सुपुत्र आहेत. तामिळनाडुच्या जनतेला तामिळनाडुचे सुपुत्र उपराष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे. तामिळनाडुच्या यंदाच्या निवडणुकीत विजय या सुपरस्टार अभिनेत्याने आपल्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात मताची विभागणी होणार आहे. याचा लाभ एनडीए ला होणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

मोदींनी अनेक चांगल्या योजना राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. देशाच्या विकासाचे राजकारण जनतेला आवडणारे असल्याने तामिळनाडुत जनता यंदा एनडीएला महाविजय मिळवुन देईल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

महिलांना संसदेत राजकीय आरक्षण देणारे महिला विधेयक संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंजुर करणार असून महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे हे विधेयक आहे. त्यामुळे देशभरातील महिला या विधेयकावर खुष आहेत. तामिळनाडुतील महिला सुध्दा या विधेयकामुळे आपल्या मतांचे दान एनडीए उमेदवारांना देतील. त्यामुळे तामिळनाडुमध्ये एनडीएचा महाविजय होईल.यंदाच्या निवडणुकीत द्रमुक चा निश्चित पराभव होईल असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी..

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देईल : पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..