vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अती दुर्गम भागातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अती दुर्गम भागातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतीदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्यशासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितले,

 गडचिरोलीसह अन्य ठिकाणी दुर्गम भागातही संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. भारत नेट टप्पा दोन अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये राज्यात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासन काम करेल. या टप्प्यातही राज्य देशात सर्वात पुढे राहून काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

बीएसएनएल व एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. यापैकी नियमानुसार काढणे शक्य असलेली आरक्षणे काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. या मालमत्तांवर नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन कार्यवाही करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोलीच्या अती दुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास नक्षलवादाचा संपूर्णपणे बीमोड करणे राज्य शासनाला शक्य होणार आहे. शासनाने नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीत संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास अधिक बळ मिळेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्ता, मोबाईल टॉवर उभारणी, प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारत नेटच्या अंतर्गत निर्माण होणारी संपर्क यंत्रणा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.

0000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टी मार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले; मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवापालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची खरीप हंगामासाठी आयोजित बैठकीत विचारणाकोल्हापूर जिल्हा खरीप २०२६ साठी सज्ज; ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन..