vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून आवाहन*

विद्यार्थ्यांच्या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून आवाहन*

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद ठाणे) – इ. ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू झाली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांनी [https://mahafyjcadmissions.in](https://mahafyjcadmissions.in) या अधिकृत संकेतस्थळावरून वेळेत ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागाने केले आहे. सदर प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे सदर वेळापत्रकाप्रमाणे सर्व पालक व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.

*शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले यांचा कोट:*”विद्यार्थ्यांची 11 वी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णतः ऑनलाईन आहे त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत जेणे करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शाखांमध्ये प्रवेश घेणे सुलभ होईल. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावरून प्रवेशासाठी नोंदणी करावी. विद्यार्थी नोंदणीकरिता अंतिम दिनांक ०३ जून, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. “

*विद्यार्थ्यांसाठी अधिक माहितीसाठी-* *अधिकृत संकेतस्थळ -* https://mahafyjcadmissions.in *ई-मेल आयडी -* support@mahafyjcadmissions.in

*हेल्पलाईन नंबर* ८५३०९५५५६४ *सुधारित प्रवेश वेळापत्रक (२०२५-२६):

* विद्यार्थी नोंदणी व अर्ज सादर:२६ मे ते ०३ जून २०२५, सायं. ६.०० वाजेपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी:

०५ जून २०२५

हरकती व दुरुस्ती सादर करणे:

०६ जून ते ०७ जून २०२५

अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप (कोटा प्रवेशासाठी)

०८ जून २०२५

शून्य फेरी प्रवेश (कोटा):

०९ जून ते ११ जून २०२५

CAP फेरी १ वाटप:

०९ जून ते १० जून २०२५

CAP फेरी १ प्रवेश प्रक्रिया:

११ जून ते १८ जून २०२५

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर

२० जून २०२५

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा गोदावरी अभ्यास गट 02 मांदांडे समितीच्या अहवालाच्या विरोधात जनजागृती अभियान – डॉ संजय लाखेपाटील

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta