vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

मासेमारी नौकांसाठी मार्च महिन्यात१ लाख ६८ हजार कि.ली. डिझेल कोटा मंजूर..

मासेमारी नौकांसाठी मार्च महिन्यात१ लाख ६८ हजार कि.ली. डिझेल कोटा मंजूर..

मुंबई, प्रतिनिधी: सन २०२५ – २६ कालावधीकरीता राज्यातील सागरी जिल्ह्यातील १३८ मच्छिमार सहकार संस्थेतील सभासदांच्या एकूण ७ हजार ७९६ यांत्रिकी मासेमारी नौकांना मार्च महिन्यासाठी १ लाख ६८ हजार १०९ कि.ली. इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

    मच्छिमार नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्याविषयी स्थापन केलेल्या समितीने हा डिझेल कोटा मंजूर केला आहे. यामध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या रिअर क्राफ्ट ऑनलाईन प्रणालीनुसार नौका नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या तसेच विधीग्राह्य मासेमारी परवाना असलेल्या अधिकृत मासेमारी नौकांनाच डिझेल कोटा अनुज्ञेय करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) च्या तरतुदींचा भंग करणाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तसेच गस्ती नौका व ड्रोन सर्वेक्षणामध्ये दोषी आढळलेल्या नौकांचा मासेमारी परवाना रद्द केला असून अशा नौकांना डिझेल कोटा देण्याचे प्रस्तावात समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचेही मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा..

कोकणा सह  मध्य महाराष्ट्रात मुंबई उपनगरात आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta

पशुधन विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन• विमा संरक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक नुकसान भरपाई• SARUS,AIC OF INDIA या अ‍ॅपवर नोंदणी बंधनकारक• विमाकृत पशुधनाचा मृत्यू झाल्यास 24 तासाच्या आत कंपनीला कळवावे

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती कल्याण येथे जागतिक महिला दिन साजरा**महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न* 

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू· वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट· महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच..

vishwatmaklokswamivarta