vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

 

अलिबाग ( प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिनांक 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने आज भीम पदयात्रा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात समाज कल्याण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

यानंतर भीम पदयात्रेची सुरुवात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली आणि तेथे पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाचे कर्मचारी, विद्यार्थी व बाह्यस्रोत कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाबाबत सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांना अनुसरून सामाजिक समतेचा संदेश जनमानसात पोहोचविणे, हेच या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट होते.”

0000

संबंधित पोस्ट

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

शनिवारी पत्रकार दिनाचे आयोजन-विकासकुमार बागडी

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

रायसेन येथील प्रगत कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांकडून मिळणार मार्गदर्शन: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

जिल्हाप्रमुख अंबेकरांच्या विनंतीनंतर शिवसैनिक म्हसलेकरांचे आंदोलन मागे !

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी