vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 

गडचिरोली द प्रतिनिधी– भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग तसेच नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. समाज कल्याण विभागाच्या वतीने नागरिकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करत मंडप उभारण्यात आला होता. पुतळ्याच्या परिसरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता झाली. या वेळी समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, नेहरू युवा केंद्राचे अमित पुंडे, प्राध्यापक दिलीप बारसागडे, लेखा अधिकारी कुलदीप मेश्राम यांच्यासह वसतिगृहातील विद्यार्थी आणि संबंधित विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बौद्ध वंदना म्हणण्यात आली आणि सामाजिक समतेचा व सहभावाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग व नेहरू युवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी* 

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

पाणीटंचाई, उष्माघाताबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया कर्जत – जामखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा