vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन..

 

राज्य प्रतिनिधी- सांगली- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी एस.टी.स्टॅण्ड सांगली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, पोलीस उपअधीक्षक (शहर विभाग सांगली) विमला एम., पोलीस उपअधिक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, महानगरपालिका उपायुक्ती स्मृती पाटील, माजी नगरसेविका स्नेहल सावंत यांच्यासह महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, तहसिलदार लिना खरात, तहसिलदार अमोल कुंभार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००००

संबंधित पोस्ट

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

पनवेल आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘MH46DG’ नवीन मालिका आकर्षक क्रमांकांसाठी 17 फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार..

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’; शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे सावकारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील