vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

नांदेड प्रतिनिधी:- देगलूर स्थित मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची 26 ऑगस्ट 2025 रोजी तपासणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने तपासणीमध्ये डॉक्टरांच्या चिठठीशिवाय औषधाची विक्री करणे, परवाने दर्शनीभागी प्रदर्शित न करणे, Tramadol युक्त औषधांच्या संगणकामध्ये नमूद साठा व औषधी दुकानामध्ये असलेला प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळून येणे, भागीदारी संपुष्टात आल्याने नियमाप्रमाणे कार्यालयाकडे नवीन परवाने प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज न करणे यासारखे गंभीर मुददे आढळून आलेले होते. त्याअनुषंगाने पेढीस कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येवून पेढीचे परवाने 21 डिसेंबर 2025 पासून रदद करण्यात आले होते.

मे. डी. ॲण्ड जी. फार्मा, देगलूर ही औषधी पेढी भागीदारमध्ये असून शशिकांत माणिकराव गरूडकर व गजानन प्रकाश ढगे हे भागीदार आहेत. त्यांनी परवाने रदद आदेशास मंत्री महोदय,अन्न व औषध प्रशासन, यांचेकडून स्थगिती आदेश प्राप्त करून घेतल्याने सदरचे औषधी दुकान पूर्ववत सुरू होते.

या कार्यालयाकडे राजेश माणिकराव गरूडकर यांनी नगरपरिषद मालमत्ता क्र. 2-871 अनुक्रमांक 2192 यामध्ये ते भोगवटार असून सदरील जागेमध्ये मे. डी. ॲण्ड जी. फार्मा हे औषधी दुकान कार्यरत आहे. ही जागा रिकामी करून मिळणेबाबत या कार्यालयाकडे विनंती केलेली होती. त्याअनुषंगाने या कार्यालयाने पेढीचे उपरोक्त नमूद प्रमाणे दोन्ही भागीदारास पत्र पाठवून जागा ताब्यात असल्याबाबतची नव्याने कागदपत्रे सादर करण्याविषयी सुचित केले होते. सदरील जागेबाबत संभ्रम असल्याने मुख्याधिकारी, नगरपरिषद, देगलूर यांना पत्र देवून सदरील जागेच्या भोगवटादारबाबत या कार्यालयास माहिती उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती.

मुख्याधिकारी, नगरपरिषद देगलूर यांनी राजेश माणिकराव गरूडकर यांची भोगवटादार म्हणून 24 फेब्रुवारी 2026 रोजी गाळयाची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना दुकान गाळा रिकामा करण्याबाबत नोटीस तामील करण्याबाबत या कार्यालयास कळविले आहे.

याबाबीवरून सदरची जागा सद्य: स्थितीमध्ये मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या औषधी पेढीचे भागीदार शशिकांत माणिकराव गरूडकर व गजानन प्रकाश ढगे तसेच राजेश माणिकराव गरूडकर यांच्या ताब्यात नसल्याचे स्पष्ट झाल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अन्वये मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या पेढीचे परवाने 21 एप्रिल 2026 पासून रदद करण्यात आलेले आहेत.  मुख्याधिकारी, देगलूर यांना मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या पेढीचे परवाने 21 एप्रिल 2026 पासून रदद करण्यात आल्याचे कळवून, त्यांचेस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सांगितले आहे.

दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मेडिकल परवाना रदद तरीही नियमबाहय औषधी विक्री या मथळयाखाली वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. त्याअनुषंगाने या कार्यालयाचे सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी 23 एप्रिल 2026 रोजी प्रत्यक्ष भेट देवून मे. डी. ॲण्ड जी. फार्मा, या दुकानाकडे बोगस ग्राहक पाठवून खोकल्याचे औषधांची मागणी केली असता त्यांनी दुकान बंद झाले असल्याचे सांगून औषधी ‍विक्री केलेली नाही. सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी वरील घटनेनंतर मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या दुकानामध्ये स्वत: ओळखपत्र दाखवून पंचासह प्रवेश करून तपास/चौकशी असता त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा औषधी साठा आढळून आलेला नाही. परवाने रदद असतांनाही औषधी दुकान कशासाठी सुरू ठेवले आहे याबाबत विचारणा केली असता या जागेमध्ये जनरल स्टोअर्स हे दुकान सुरू करावयाचे असल्याने साफसफाईसाठी सुरू ठेवलेली असल्याचे सांगितले.

तसेच पेढीमधील हजर व्यक्ती अक्षय दिलीपराव गरूडकर यांना औषधी परवाने ऑनलाईन रदद करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. 22 एप्रिल 2026 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज पंचासमक्ष तपासण्यात आले असता त्याठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधी विक्री झाली नसल्याचे दिसून आले आहे. वरील सर्व घटनेचा पंचनामा पंचासमक्ष करण्यात आलेला आहे. 23 एप्रिल 2026 रोजीचे तपासणीमध्ये मे. डी ॲण्ड जी फार्मा ही औषधी पेढीही 21 एप्रिल रोजी परवाने रदद झालेल्या दिनांकापासून बंद केलेली असून कसल्याही प्रकारची औषध खरेदी /विक्री करीत नसल्याचे स्पष्ट केले.

00000

संबंधित पोस्ट

जव्हार अर्बन बँकेच्या नोकर भरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

सहकार चळवळीच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

vishwatmaklokswamivarta