vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना #गॅसपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

सध्यस्थितीत पुण्यात सुरू असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना #एलपीजी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी स्वीडन, जपान आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्य दूत यांच्या विनंतीवरून सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत स्वीडनचे महावाणिज्य दूत आणि डीन ऑफ द कॉन्सुलर कॉर्प्स स्वेन ऑस्टबर्ग, जपानचे महावाणिज्यदूत कोजी यागी आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्यदूत डोंगवान यू, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ.राजेश गवांदे, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे, राज्यातील तेल कंपन्यांचे समन्वयक उमेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसादओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी,विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली.