vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

 

        सांगली, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत जादूटोणा विषयी कायद्याची माहिती व प्रयोग तसेच चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा प्रतिभा इंगळे, उपायुक्त नागनाथ चौगुले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त ‍नितीन उबाळे, जिल्हा जाती पडताळणी समिती चे संशोधन अधिकारी मेघराज भाते, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती भांबुरे, महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन, अनिस संपादक राहुल थोरात, आशा धनाले, त्रिशला शहा, जगदीश काबरे आदि उपस्थित होते.

यावेळी अनिस संपादक राहुल थोरात यांनी अंधश्रद्धा व जादूटोणा विषयी सविस्तर माहिती दिली. अनिस या संस्थेतील आशा धनाले व त्रिशला शहा यांनी अंधश्रद्धा अंतर्गत येणाऱ्या जादू विषयी प्रयोगाचे प्रदर्शन करून दाखविले व सभागृहातील लोकांना अघोरी प्रथा कशा होतात याबाबत अवगत केले. विज्ञान अभ्यासक जगदीश काबरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.

   सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रास्ताविक केले व सामूहिक उद्देशिका वाचन केले. कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादूत, नागरीक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटीलअवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत..

मुंबईतील विलेपार्ले भागात स्थित साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या की, घातपात? कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-

आसाम मध्ये प्रचाराचा धुमधडाका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची काँग्रेसवर जोरदार टीका-विकसित आणि घुसखोरमुक्त आसामसाठी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजयी केल्याचं आवाहन त्यांनी केले 

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाष दिन संपन्न

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta