vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी १३५६ कोटीचा मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी १३५६ कोटीचा मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, प्रतिनिधी : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

सातारा : जिल्ह्यातील ११ हजार ११३ शेतकऱ्यांच्या चार हजार २१९.२८ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी सहा कोटी २९ लाख तीन हजार रुपयेकोल्हापूर : जिल्ह्यातील पाच हजार ८६० शेतकऱ्यांच्या एक हजार ६९६.३६ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन कोटी १८ लाख रुपयेबीड : आठ लाख सहा हजार ५१३ शेतकऱ्यांच्या सहा लाख ४४ हजार ९१८.५५ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ५७७ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये.धाराशिव : चार लाख चार हजार ६५६ शेतकऱ्यांच्या तीन लाख ११ हजार २९१.२३ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २९२ कोटी ४९ लाख २२ हजार रुपये

लातूर : चार लाख १५ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या २३ लाख सहा हजार ६२८.९९ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २०२ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये

परभणी : चार लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८५ हजार ८५३.७८ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार नांदेड : ८३ हजार २६७ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७३.०२ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये.

मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले, नैसर्गिकआपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होईल

00000

संबंधित पोस्ट

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खतेआणि कर्ज उपलब्ध करा- पालकमंत्री शिरसाट

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यकारिणीचा-भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सत्कार

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा उपनगरी रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रेल्वे प्रवाशांची उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.