vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता-वेळापत्रकात दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता-वेळापत्रकात दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

रायगड-अलिबाग( प्रतिनिधी:- शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता वेळापत्रकात दि.30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी दिली आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A,B,D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) 12 वी नंतर सन 2026-27 या वर्षातील व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmasnew.mahait.org, राबविण्यासाठी वसतिगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यवसायिक विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचण येत असल्यास सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

0000000

संबंधित पोस्ट

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे श्री गणेशोत्सव नियोजन बैठकीप्रसंगी आवाहन   

शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा**शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची दक्षता घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन