vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 सांगली, प्रतिनिधी : सांगली, मिरज व कुपवाड मनपा निवडणूक-2025, विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 30 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

            या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

            हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 30 डिसेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 14 जानेवारी 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईतून धक्कादायक बातमी वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले

ऑरिक स्मार्ट सिटीने औद्योगिक उत्कृष्टता आणि परिवर्तनाची सहा वर्षे केली साजरी विविध प्रकल्पांमुळे 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, 62,405 रोजगारांचीही निर्मिती होणार बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे प्रकल्प आणि 4 बिगर सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू