vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ला लागावे- ना.मंगलप्रभात लोढा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ला लागावे- ना.मंगलप्रभात लोढा

जालना, प्रतिनिधी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकरच होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी देशातील नरेंद्र मोदी सरकारने व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या जनहिताच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून देशात व राज्यात केंद्र व राज्य सरकारने केलेले कामे हि समजून सांगावी, आपल्या जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळवावा असे त्यांनी भाजपा कार्यालयात झालेल्या जालना महानगर व जालना ग्रामिण जिल्ह्याच्या कोअर कमिटी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू-भगिनी यांच्यासोबत संवाद साधताना केले. यावेळी माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, मनोज पांगारकर राजेश राऊत, अशोक पांगारकर, सौ.संध्याताई देठे, सौ.आशाताई पांडे, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, बद्रीनाथ पठाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मध्ये विजय मिळवणे हे भारतीय जनता पार्टीचे ध्येय साध्य करण्यासाठी बूथ प्रमुखापासून ते मंडळ अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अशा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि आपण ते निश्चित पूर्ण करणार असा मला विश्वास आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव आबा दानवे, मनोज पांगारकर यांची हि मार्गदर्शन पर भाषणे झाली व होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवू असे सांगितले

यावेळी देविदास कुचे, दीपक ठाकूर, अवधूत खडके, सुनील पवार, सोपान पेंढारकर, सतीश जाधव, चंपालाल भगत, धनराज काबलीये, भागवत बावणे, कपिल दहेकर, अर्जुन गेही, अनिल कोलते, विष्णू डोंगरे, अनिल सरकटे, सिद्धिविनायक मुळे, शशिकांत घुगे, रवि अग्रवाल, सुनील खरे, ज्ञानेश्वर भागिले, मनोज शिंदे, महेश निकम, संजय डोंगरे, भगवान मात्रे, गजानन नागवे, छत्रगुण कणसे, नितीन राठोड, विक्रम उफाड, पुरुषोत्तम उढाण, सौरभ कुलकर्णी, संजय आटोळे, संपत टकले, सुजित जोगस, वसंत शिंदे, शिवराज जाधव, ज्ञानेश्वर ढोबळे, सोमनाथ गायकवाड, सुमित सुरडकर, विजय मोहिते, राजाराम जाधव, सिद्धेश्वर हासबे, हरिभाऊ गोरे, सतीश केळकर, मुकेश चव्हाण, गजानन खरात, रामजी शेजूळ, कृष्णा गायके, डोंगरसिंग साबळे, प्रमोद गंडाळ, संतोष खंडेलवाल, नागेश अंभोरे इत्यादीसह महानगर व ग्रामीण जिल्ह्यातील कोअर कमिटीमधील सर्व सदस्य व भाजपा पदाधिकारी बंधू-भगिनी उपस्थित होते.बाबासाहेब पाटील कोलतेप्रसिद्धीप्रमुख

000000

संबंधित पोस्ट

स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील#राष्ट्रीयग्राहकदिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा

पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

कन्यादिन साजरा; पीसीपीएनडीटी, बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती मुलींच्या जन्माचे स्वागत करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

शांतता समितीची सभा; बकरी ईद सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील• गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी• जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे..

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन