vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

नांदेड, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. ४) पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले

अचानक केलेल्या पाहणीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ तहसीलदार संजय वारकड यांना माहिती दिली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

कारवाईदरम्यान नदीच्या दुसऱ्या बाजूने हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर यांनाही सतर्क करण्यात आले. संयुक्त पथकाने दोन बोटी व २० तराफे नष्ट करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली.

दरम्यान, कारवाईनंतर परतत असताना शहर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहनेही पकडण्यात आली. ही वाहने पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या चार मजुरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या मोहिमेत तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण ओमकांत चिंचोलकर, श्री केंद्रे, श्री मठवाड पोलीस उपनिरीक्षक, श्रीकृष्ण येलमटे, सय्यद मोहसीन मंडळ अधिकारी, सर्व तलाठी माधव भिसे , सरपे ,मारुती श्रीरामे , वानोळे, डॉ.जोशी मारुती कदम, राजेश बरोडा, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादींनी सदरील कारवाई केली आहे. पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी सहभाग घेतलाअवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

00000

संबंधित पोस्ट

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठीउद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta

‘ई-लायब्ररी’चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण:वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta