vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना, राज्यातील जनतेला आणि सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांना सुखाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो.

प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण नववर्ष ही उत्तम संधी आहे. हे स्वप्न साकार करताना उद्यमशीलता व संत विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर लोकांची भूमी आहे. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम – मंत्री डॉ. अशोक वुईके आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी बहुआयामी प्रयत्न

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी…

vishwatmaklokswamivarta

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

vishwatmaklokswamivarta