vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी…

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी…

 राज्य प्रतिनिधी-नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी,दक्षिण भारत आणि दक्षिण कोकणात जाणाऱ्यांसाठीही रेल्वेने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. एलटीटी-मंगळुरू ही साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवारी सुटेल. पनवेल-मडगाव ही पनवेलमार्गे धावणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अतिरिक्त दिलासा देणारी ठरेल. या विशेष गाड्यांचे स्वरूप लक्षात घेता रेल्वेने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रवाशांची मागणी पाहता या गाड्यांना वीस ते बावीस डबे जोडले जाणार आहेत. यामध्ये टू-टियर एसी, थ्री-टियर एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश असेल. या गाड्यांचे आरक्षण आता खुले झाले असून आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि आरक्षण केंद्रांवर प्रवाशांना तिकीट घेता येईल. या गाड्यांना विशेष भाडे लागू असेल. नाशिक, मुंबई आणि पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे

कोकण आणि गोवा या दोन्ही प्रदेशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. रेल्वेने वेळेत या शहात्तर विशेष गाड्यांची घोषणा केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आणि स्थानिक पर्यटन संस्थांना मोठा फायदा होणार आहे. नाशिकमधील प्रवाशांनाही पनवेल किंवा कल्याण मार्गे या गाड्या पकडून थेट कोकणात जाता येईल

 नाताळच्या सुट्ट्या आणि एकतीस डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी दरवर्षी लाखो पर्यटक कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यांकडे धाव घेतात. या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण कित्येक महिने आधीच फुल्ल झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. हीच गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने यावर्षी शहात्तर विशेष हिवाळी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक फेऱ्या मुंबई ते करमाळी या मार्गावर होणार आहेत.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते करमाळी दरम्यान रोज विशेष गाडी चालवण्याचे नियोजन केले आहे. पहिली विशेष गाडी ही मुंबई सीएसएमटीवरून दररोज मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांनी वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीवरून दररोज दुपारी सव्वादोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेचार वाजता मुंबईत पोहोचेल. १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत या गाड्यांच्या रोज फेऱ्या होतील. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे या गाड्या थांबतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी अठरा फेऱ्या होतील. एलटीटी येथून सुटणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा

संबंधित पोस्ट

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाईकारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार 

vishwatmaklokswamivarta

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग

मुंबईत आता नोंदणी न केलेला भाडेकरार आता बेकायदेशीर-ऑनलाइन नोंदणी आवश्यक….

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये विकास परिषदेचे उद्घाटन करणार