vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) विकसित करण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच शासन निर्णय दि.17/07/2025 अन्वये कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित करण्यात आलेली आहे. या धोरणानुसार, ठाणे जिल्ह्यात कृत्रिम वाळूचे उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होवून त्यांना योग्य लाभ घेता यावा, याकरीता 1 ऑगस्ट “महसूल दिनापासून” दि.7 ऑगस्ट 2025 पर्यंत “महसूल सप्ताह-2025” साजरा करण्यात बाबत दि.29/07/2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. “महसूल सप्ताह-2025” मध्ये कृत्रिम वाळू धोरणाची माहिती देण्यासाठी आणि इच्छुक व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवार, दि.7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत एका ऑनलाईन कार्यशाळा (वेबिनारचे) आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील रहिवासी किंवा महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या आणि प्रथम पुढाकार घेणाऱ्या 50 संस्थांना M-Sand युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग आणि महसूल विभागाकडून विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.

या वेबिनारमध्ये कोण सहभागी होऊ शकते?

* ठाणे जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले आणि 100% M-Sand उत्पादन करू इच्छिणारे क्रशरधारक, खदानधारक.* खाजगी जागेत नवीन क्रशर उभारून 100% M-Sand उत्पादन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था.* या धोरणाबद्दल माहिती घेण्यास इच्छुक असलेले सर्वसामान्य नागरिक.वेबिनारमध्ये कसे सहभागी व्हावे?इच्छुक व्यक्ती किंवा संस्था https://meet.google.com/iqn-bceg-fdp या लिंकवर क्लिक करून थेट वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात.M-Sand उत्पादन सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी शासनाच्या “महाखनिज” या ऑनलाइन प्रणालीवर ( https://mahakhanij.maharashtra.gov.in ) महा-ई-सेवा केंद्राद्वारे किंवा स्वतःहून अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.या धोरणाबद्दल अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.thane.nic.in या वेबसाइटला भेट देवू शकता. तसेच, याबाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास retigat.thane@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

नशामुक्तीचा लढा हा देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांकडून अमली पदार्थमुक्तीची शपथ

vishwatmaklokswamivarta