vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026

‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026

                                                                                                                                                                                                                                                                                    नांदेड प्रतिनिधी :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्के म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद आणि माविम यांच्याद्वारे पुरस्कृत महिला बचतगट तसेच गाव संघ पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, ते गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रीया ऑनलाईन लॉटरी पध्दतीने केली जाईल, यासंबंधीचे निर्देश कृषी विभागाने दिले                                                                                                                                                            या कृषी अवजारांची करता येणार खरेदीनिवड झालेल्या गटांना गावस्तरावर अवजार बँक स्थापन करण्यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यासारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.

लाभार्थी निवडीची पद्धत: योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थीची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. जर प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आले                                                                                                                                                                        अर्ज करण्यासाठी कृषी विभागातर्फे आवाहन इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर (https://dbtndksp.mahapocra.gov.in/) वर ५ एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे