vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, प्रतिनिधी : ‘अनंत कन्हेरे : द बुलेट दॅट अवोक भारत’ या क्रांतिकारक अनंत कन्हेरे यांच्या जीवनावरील इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे संपन्न झाले.

अनंत कन्हेरे यांच्यावरील प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्या मूळ मराठी पुस्तकाचा सदर पुस्तक अनुवाद आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सत्याग्रह चळवळीसोबतच क्रांतिकारी राष्ट्रवादाची एक प्रभावी विचारधारा होती. या क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अपेक्षित प्रमाणात गौरविले गेलेले नाही. अश्या अज्ञात क्रांतिकारकांचे जीवन, कार्य आणि त्याग यांचे दस्तऐवजीकरण स्वतंत्र लघु पुस्तकांच्या मालिकेद्वारे व्हावे, जेणेकरून नव्या पिढीला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे समग्र आकलन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

क्रांतिकारकांवरील पुस्तके मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित व्हावी असेही राज्यपालांनी सांगितले. भाषांतर हे भाषा आणि प्रदेश यांमधील दुवा म्हणून कार्य करते. त्यामुळे या राष्ट्रनायकांच्या प्रेरणादायी कथा देशभरातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि सर्वांना प्रेरणा देतील, असे त्यांनी सांगितले.

प्रकाशन सोहळ्याला भारतीय विचार साधना संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश आफळे, जयेश क्षेमकल्याणी, अनुवादक चिन्मय खेडेकर, रवींद्र संघवी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी

रसायने व साहित्य खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत

महामंडळांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागांनी समन्वय साधावा – उपसभापती सचिन अहिर

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस,राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान देशभरातील ८२ शिक्षक सन्मानित

vishwatmaklokswamivarta