vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

‘हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

      नवी मुंबई प्रतिनिधी-  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या अनुषंगाने देशातील सुपर स्वच्छ शहरांमध्ये नामांकित असलेल्या नवी मुंबई शहरातही महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत विविध भागांतील दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात असून त्यासोबतच सोसायट्या, वसाहती याठिकाणी कच-याचे 4 प्रकारे वर्गीकरण करण्याविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

          या अंतर्गत घणसोली सेक्टर 30 येथील यशोदीप हाईट्स सोसायटी तसेच सेक्टर 8 येथील गामी रिजन सोसायटी याठिकाणी सोसायटीमधील रहिवाशी तसेच सोसायटीचे स्वच्छताकर्मी यांना कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले.

          सेक्टर 6 समर्थनगर घणसोली भागात स्वच्छता मोहीमेप्रमाणेच आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्वच्छताकर्मींनी परिसर स्वच्छ करतानाच पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याने उघड्यावर पडलेले टायर्स व इतर साहित्य जमा करण्यात आले. अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहीमा करावेगाव, आग्रोळीगाव, दिघा विभागातील व्यावसायिक क्षेत्र, सेक्टर 16 जय भवानी मार्केट ऐरोली, जुहूगाव, महापेगाव याठिकाणी राबविण्यात आल्या.

          ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीमा तसेच आरोग्य विभागामार्फत मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमा तसेच मूषक नियंत्रण मोहीमा संयुक्तपणे राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली संयुक्तपणे या विशेष सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून नागरिकांचाही या मोहीमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

         तरी नवी मुंबईकर नागरिकांनी पावसाळी कालावधीत साथरोगांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आपल्या घरात व घराभोवताली पाणी साचून राहिल्यास होणारी डासउत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घ्यावी व तापसदृश्य स्थिती असल्यास तत्परतेने वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईतील पारसिक हिल, बेलापूर येथील धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई

लाडकी बहीण योजने’चा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

vishwatmaklokswamivarta