vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

रायगड प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुलांमध्ये देशप्रेम जागविणे, त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण व्हावी तसेच त्यांना विविध शस्त्रांबाबत माहिती व त्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांमधून स्वयंसेवकांची नेमणूक करावयाची असून स्वेच्छेने काम करण्यास इच्छूक असणाऱ्या माजी सैनिकांनी आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड यांच्याकडे त्वरीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,रायगड ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे

  प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माजी सैनिकांचे जवळील वा गावातील शाळांमध्ये मुलांना 01 तास प्रशिक्षण द्यावयाचे प्रस्तावित आहे. माजी सैनिक स्वयंसेवक पदावर विना मानधन काम करण्यास इच्छूक असल्यास व असे माजी सैनिक सद्या शासकीय सेवेमध्ये काम करत असल्यास त्यांना प्रशिक्षणाचे दिवशी काम करण्याची मंजूरी त्यांच्या वरीष्ठ कार्यालयाकडून घेण्यात येईल. स्वयंसेवक पदावर काम करण्यास इच्छुक माजी सैनिकांची माहिती संकलित करण्याकरीता गूगल फॉर्म भरण्यासाठी माजी सैनिक ग्रृपवर पाठविण्यात आलेला आहे.

००००००

संबंधित पोस्ट

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरणशाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर केंद्राचे बळकटीकरण करा -उपमुख्यमंत्री

बाल हक्क संरक्षण परिषद बालकांच्या हक्कांचे संरक्षण आपले उत्तरदायित्व- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा जालना महानगर आणि योग भूमी परिवारातर्फे सामूहिक योगाभ्यास