vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी -प्रकल्प संचालक शालिनी कडू

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी -प्रकल्प संचालक शालिनी कडू

– पुणे प्रतिनिधीजिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहायता समूह नोंद ‘लोकोश ॲप’वर करणे अनिवार्य केल्याने संपूर्ण २६ हजार ६१० स्वयंसहायता समूहांची ॲप डिजिटल पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकल महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘माझे अस्तित्व’ योजनेअंतर्गत तयार होणारे नवीन महिला बचत गटाची देखील सदर लोकेश ॲपवर नोंद करण्याची कार्यवाही प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे. या डिजिटल नोंदणी प्रक्रियेमुळे समूहांची अचूक अशी माहिती संकलित केली जाते आणि भविष्यात वेळोवेळी माहिती सहज उपलब्ध होते.तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत व सहज मिळण्यासाठी या बाबीची मदत होते.

यामुळे योजनेच्या महिला लाभधारकांना प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळतो. ॲपमध्ये नोंदणी करताना समूहांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो आणि त्या ओळख क्रमांकावरून महिलांना एकाच योजनेचा लाभ दुबार मिळत नाही. या शिवाय एखादी महिला अनावधानाने किंवा काही वेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या गटांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही टाळले जाते. एका महिलेला एकाच महिला बचत गटामध्ये नियमानुसार राहता येते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता समूहाची स्थापना केली जात ते त्यावरून त्यांचे सामाजिक संघटन व सामाजिक समावेशन केले जाते. त्यानंतर अशा सर्व गटांना ग्राम संघ व प्रभाग संघावर महिलांच्या संस्था स्थापन करून धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करून एकूणच महिलांचे सामाजिक संघटन व आर्थिक समावेशन करून लाभ उपलब्ध करून दिला आहे.

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांमध्ये बचत स्वयंरोजगार डिजिटल साक्षरता आणि आर्थिक शिस्त यांचा माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून येतआहे या उपक्रमात सर्व पात्र महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या महिला बचत गटांना देण्यात येणारा उमेद अभियानाचा विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन श्रीमती कडू यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

vishwatmaklokswamivarta

अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई

vishwatmaklokswamivarta

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर…