vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई

अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई

 

नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई – काळाची पावले ओळखून भविष्यात AI तंत्रज्ञान प्रशासनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान अवगत करावे असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले..

 प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग आणि विश्वनिकेतन व्यवस्थापन उद्योजकता संस्था खालापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने AI तंत्रज्ञानाचा प्रशासनात वापर या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रादेशिक उपायुक्त सोळंकी बोलत होते.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या प्रत्येक विभागात 100 दिवस उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

प्रशासनात AI तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करू शकतो या विषयावर विश्वनिकेतन संस्थेचे प्राध्यापक अंकुश पवार ,मोकल ,यश यांनी कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.. यावेळी मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर ,रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुंबईकरांसाठी बातमी! 13-14 एप्रिल शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल; आंबेडकर जयंतीनिमित्ताने निर्देश

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..