vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

 

     मुंबई प्रतिनिधी- गोरेगाव येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा झालेला मृत्यू आणि राज्यात फोफावलेला अमली पदार्थांचा व्यापार, हे महाराष्ट्र ‘उडता पंजाब’ होण्याच्या दिशेने चालल्याचे लक्षण आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ न घालवता तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवावे; तसेच ‘सनबर्न’, म्युझिक कॉन्सर्ट, रेव्हा पार्ट्या आदी भारतीय संस्कृतीविरोधी कार्यक्रमांमुळे तरुण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याने, याला जबाबदार असणारे आयोजक तथा प्रशासकीय यंत्रणा यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीने यापूर्वीही मुंबई आणि गोवा येथील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला तीव्र विरोध केला होता, कारण अशा कार्यक्रमांतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा होणारी सामाजिक आणि राष्ट्रीय हानी अधिक गंभीर आहे.

  अंमली पदार्थांचे हे पसरलेले जाळे केवळ व्यसनाधीनतेपुरते मर्यादित नसून देशाला पोखरण्याचे एक मोठे युद्धच आहे. ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२५ मध्ये २००० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त होणे आणि नाशिक, मुंबई-साताऱ्यासारख्या शहरांत ड्रग्जचे कारखाने सापडणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आव्हान आहे. भारत हा ‘गोल्डन क्रेसेंट’ आणि ‘गोल्डन ट्रँगल’च्या मध्यभागी असल्याने तस्करांकडून देशाचा वापर ‘ट्रान्झिट रूट’ म्हणून केला जात आहे. तरी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केवळ तस्करांच्याच नव्हे, तर अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या मुसक्या आवळून तरुण पिढीला या विळख्यातून वाचवावे, असे आवाहन समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी दिली ऑनलाईन परीक्षा* 

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम  पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..

दि.22 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta