vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नाशिक येथे महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे  निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही

नाशिक येथे महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे  निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही

राज्य प्रतिनिधी-

नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे  निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे अशोक चव्हाण प्रकरणावरुन एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय निर्माण होत आहे. त्यामुळे, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यां यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजित दादांच्या अपघातापूर्वीचे CCTV फुटेज समोर येऊ शकले नाही, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारचं नाही, अशीही खंत आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली. जितेंद्र शेळके यांची दोन दिवसापूर्वी चौकशी होते, आज चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेलं? याचं खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंका असल्यासं मिटकरी यांनी म्हटलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर 2 पोज़िशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर ह्याच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते, विशेष म्हणजे 3 दिवसापूर्वी त्यांची ED चौकशी झाली आणि आज ते अपघातात वारले? हा अपघात असूच शकत नाही,” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. त्यामुळे, आता या अपघाताची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

रोहित पवार यांनीही व्यक्त केला संशय, रोहित पवार यांनीही ट्विट करुन शंका उपस्थित केली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरातचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेकबाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

संबंधित पोस्ट

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास यंत्रणा सज्ज- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…