vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग, तृतीयपंथीयांसह वंचित घटकांतील मतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम

दिव्यांग, तृतीयपंथीयांसह वंचित घटकांतील मतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत दिव्यांग, तृतीयपंथीय, महिला सेक्स वर्कर्स, अनाथ, बेघर तसेच फुटपाथवर राहणाऱ्या पात्र नागरिकांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३० जून २०२६ पासून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे

जिल्ह्यातील दिव्यांग, तृतीयपंथीय, महिला सेक्स वर्कर्स, अनाथ, बेघर अथवा फुटपाथवर राहणारे नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना या घटकांतील पात्र नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

या मोहिमेअंतर्गत शहरातील १०७-औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम आणि १०९-औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघांसाठी संयुक्तपणे जिल्हा समाज कल्याण कार्यालयात तृतीयपंथीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला संबंधित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या विशेष मोहिमेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा आणि कोणताही पात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

सदर मोहीम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या आदेशाने तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल

गोवा पोलिसांनी अर्पोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर जनरल मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये उद्या स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

vishwatmaklokswamivarta