vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

      सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्याकरिता दि. 15 ते 17 एप्रिल 2026 अखेर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबतच्या उपाययोजनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे,चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे?  तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी / व्यक्तिंनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रूमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे. घरी तयार करण्यात आलेली लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी इत्यादिंचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना / पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
       पंखे ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर उन्हात काम करीत असताना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा. टीन पञ्याच्या छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे. छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहाय्याने झाकाव्यात.
काय करू नये?      लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. उष्माघाताचे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा. ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.
0000

संबंधित पोस्ट

भरपावसात पावनखिंडीत इतिहासाचा जागर; हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘पावनखिंड मोहीम’ उत्साहात*नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती*

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी*मुरूम येथील श्रीमंत सुभेदार *मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी*सहकार्य करणार**-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे* 

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणूक -2026 काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर नवीन महायुती सरकारचा पहिला तर अजित पवारांचा ११ वा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले